मराठी पुस्तकांचे माहेरघर, ‘बॉम्बे बुक डेपो’ आणि मी, पुस्तक पंढरीचा वारकरी!
‘मराठी पुस्तकांचे माहेरघर’ हे बिरुद मिरवण्याचा अधिकार काही वर्षांपूर्वी फक्त मुंबईच्या गिरगावातील ‘बॉम्बे बुक डेपो’ या दुकानाचा होता. आणि त्याचे शिल्पकार होते, पांडुरंग कुमठा. ‘बालसाहित्य जत्रा’, ‘पुस्तक जत्रा’, ‘स्वाक्षरी सप्ताह’,‘पुस्तक पंढरी’, ‘साहित्य दिंडी’, ‘बॉम्बे बुक क्लब’, ‘बॉम्बे बुक अॅवॉर्ड’, ‘बालसाहित्य जत्रा’ मासिक, ’पुस्तक पंढरी’ मासिक, असे कितीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम कुमठा यांनी राबवले.......